दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 15 लाख 70 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेय.