गेल्या पाच वर्षांत फुटीच्या राजकारणाची कीड लागलेलं महाराष्ट्राचं राजकारण निवडणुकांनंतरही शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत.. भाजपकडे आमदारांची भरभक्कम संख्या आहे... राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपैकी एखाद्याने सत्तेत सहभागी होत नाही असं म्हटलं तरी सरकारला फरक पडणार नाही.. मात्र तिन्ही पक्ष सध्या सत्तेत सहभागी झालेत.. मंत्रिमंडळही स्थापन झालंय.. पण अंतर्गत कुरबुरी इतक्या सुरू आहेत की महायुती आहे तशीच राहणार का अशी शंका आहे.. दुसरीकडे महाविकास आघाडीतही काही फार बरे सुर नाहीत.. तिथेही फुटीच्या चर्चा आहेत.. आता हे सगळं खरं आहे की दबावतंत्राचा भाग म्हणून नेत्यांकडून या पुड्या सोडल्या जातायत हे कळायला आपल्याला थोडी कळ काढावी लागू शकते..