जीबीएस म्हणजेच गुईलेन बॅरे सिंड्रोम... उच्चारायलाही महाकठीण असलेला हा आजार सध्या पुण्यात धुमाकूळ घालतोय.. हा आजार कशामुळे होतो, कशामुळे पसरतो, कोणत्या वयोगटाला त्याचा धोका आहे, त्याचा प्रसार रोखायचा कसा, या सगळ्याबाबत वैद्यकीय क्षेत्रात सध्या स्पष्टता नाहीय.. हा आजार पाण्यातून पसरतो असा अंदाज असल्याने पुणे महापालिका सध्या पाण्याचे नमुनेही तपासतेय.. पण अगदी काही तासांत मेंदूवर ताबा घेऊन अवघं शरीर लुळं करणारा हा आजार सध्या चिंतेची बाब बनलाय..