Navi Mumbai मध्ये 16 तास पाणीपुरवठा बंद, मोरबे जलवाहिनीच्या कामांमुळे नागरिकांना फटका

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. नवी मुंबई महानगरपालिकेकडून मोरबे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक कामे हाती घेतली जाणार असल्याने 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 7 ऑक्टोबरच्या पहाटे 2 वाजेपर्यंत तब्बल 16 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच खारघर आणि कामोठे या परिसरांना याचा फटका बसणार आहे. तसेच 7 ऑक्टोबर रोजी सकाळी आणि सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

संबंधित व्हिडीओ