मुलुंड मेट्रो पिलर दूर्घटना ताजी असतांनाच घाटकोपच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो ४ च्या बीमला तीन मोठे तडे गेलेत. क्रॅकमुळे थोड जरी बांधकाम खाली पडलं तरी मोठी हानी होण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीनं अॅक्शन घेण्यासंबंधी पत्र पाठवण्यात आलंय. एका नागरिकाकडून व्हॉट्सअॅपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. एल.बी.एस. रोडवरील आर-सिटी मॉलजवळ मेट्रो लाईन 4 च्या सुपरस्ट्रक्चर बीममध्ये ‘मॅक्रो क्रॅक्स’ दिसून आल्याची माहिती मिळतेय. मेट्रो लाईन ४ च्या सर्व बांधकामाची तपासणी, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे पालिका प्रशासनानं आदेश दिलेत.मुंबईत मेट्रोच्या कामांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.