राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत खलबतं सुरु आहेत.शरद पवार गटाला बाजूला ठेवून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.. उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळतेय.राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे.मतांचा कोटा 36 असून महाविकास आघाडीकडे 50 मतदार असून त्यामुळे 7 पैकी एक जागा मिळणार हे निश्चित आहे. संख्याबळानुसार राज्यसभेवर ठाकरे गटानं दावा केलाय.दोन पक्षात राज्यसभा आणि विधान परिषद जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय.