UP मध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शाहू छत्रपती यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

उत्तर प्रदेशातील उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अकरा फुटी पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचे भूमिपूजन सोहळा खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पार पडला.. जौनपूर जिल्ह्यातील कुसरना या गावात हा पुतळा उभारण्यात येणार आहे. आशा ज्योती रूरल उडान फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला.. यामध्ये महाराजांचा 11 फूट उंच अश्वारुढ पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा या नावाने असलेले ग्रंथालय, अकॅडमी, कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी ग्रामस्थानी मोठ्या उत्साहात स्वागत करत ढोल ताशाच्या गजरात शाहू छत्रपती यांची व्हिन्टेज कारमधून मिरवणूक काढली.

संबंधित व्हिडीओ