HSC Akola | HSC परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, रुग्णालयातच दिला गणिताचा पेपर | NDTV

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात HSC परीक्षेदरम्यान एक धक्कादायक पण दिलासादायक घटना समोर आली... अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेज, हिरपूर येथील विद्यार्थिनी श्रेया गुणवंत देशमुख हिची गणिताच्या पेपरदरम्यान अचानक प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध पडली... घटनेची माहिती केंद्र संचालकांनी त्वरित वरिष्ठांना दिली परीक्षा प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद देत तिला महाजन रुग्णालयात दाखल केले.... प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीने रुग्णालयातच परीक्षा पूर्ण केली. संपूर्ण प्रक्रियेत महिला पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या तत्परतेमुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान टळले.

संबंधित व्हिडीओ