बीड जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 179 रिक्त पोलिस पाटील पदांसाठी आज लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. बीड, आष्टी, माजलगाव, अंबेजोगाई आणि परळी या पाच शहरांमधील एकूण 33 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे... या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 11 हजार 325 उमेदवारांनी अर्ज केलाय.. केंद्रांबाहेर उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी भरारी पथकाकडून विविध केंद्रांवर अचानक पाहणी करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेवर लागले आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...