बीडच्या गेवराईमध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय. छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव कंटेनरनं बंद पडलेल्या कार ला जोरदार धडक दिली आणि या अपघातात बंद पडलेल्या कार मधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.