मुंबईच्या पावसानं पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल केली आहे. यानंतर नाले सफाई वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. मंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली या बैठकीमध्ये नाले सफाई बाबत चर्चा झाली आहे. दरम्यान या भेटीनंतर आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावरती खापर फोडलंय.