नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून १७ दिवसांत ८३१ टन आंबा निर्यात झाला आहे.अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झालाय.गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील महत्त्वाच्या देशांमध्ये निर्जंतुकीकरणाचे सर्व निकष पाळून आंबा निर्यातीची सुविधा येथे उपलब्ध आहे. १ एप्रिलपासून प्रत्यक्षात निर्यात सुरू झाली आहे.