नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पेटण्याची चिन्हे. सीजेपीचे अभिजीत दिपके आज नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार. गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू. संध्याकाळी उपोषणस्थळी जाऊन अभिजीत दिपके विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांवर करणार चर्चा.आदित्य ठाकरे देखील थोड्याच वेळात आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी करणार चर्चा. काल राहुल गांधी यांनीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत साधला होता संवाद.