Pune news l हल्ल्याच्या घटनेनंतर Vidyanand Bapat पोलीस ठाण्यात दाखल, बापटांची वैद्यकीय तपासणी पूर्ण

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झालीय. पुण्यातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली आहे. गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली. संतोष चव्हाण असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे पोलिसांनी संतोष चव्हाणला अटक केलीय..विद्यानंद बापट पोलीस ठाण्यात दाखल. हल्ल्याच्या घटनेनंतर बापट पोलिसात दाखल.वैद्यकीय तपासणी पूर्ण करून विद्यानंद बापट यांना फरासखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी आणला आहे. विद्यानंद बापट यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केला जात आहे.

संबंधित व्हिडीओ