पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झालीय. पुण्यातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली आहे. गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली. संतोष चव्हाण असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे पोलिसांनी संतोष चव्हाणला अटक केलीय..विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही खंत व्यक्त केली जातेय..