गणेशोत्सवाचे वेध लागताच तळकोकणात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कुडाळ तालुक्यातील वाडी वरवडे येथील मूर्तीशाळेत सध्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग पाहायला मिळत आहे. मूर्तिकार रावजी धुरी अत्यंत कौशल्याने बाप्पाच्या मूर्ती घडवत आहेत..यंदाच्या वर्षी गणेशभक्तांकडून 'छत्रपती' रूपातील मूर्तींना मोठी मागणी असल्याचे चित्र आहे....तळकोकणात गणेशोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून मूर्तीशाळांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.' कारखान्यात दिवस-रात्र बाप्पाच्या मनमोहक मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे....गणेश मूर्तिकार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी
Elaborate preparations in South Konkan for Bappa's arrival; high demand for idols depicting 'Chhatrapati'.