मुंबई महानगरपालिकेतील उपहारगृहाची महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी पाहणी केली.या पाहणी दरम्यान महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांनी एकमेकींना जिलेबी भरवली. गेले काही दिवस दोघींमध्ये सातत्याने वाद होत असल्याचा बातम्या समोर येत होत्या.भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील दोघींमध्ये खडाजंगी झाल्याच्या चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर आज दोघींनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली.आणि त्यांनंतर महापालिका उपहारगृहाची पाहणी केली. महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न.