जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आक्षेपार्ह आणि हिंसक सादरीकरण केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाळेत आक्षेपार्ह सादरीकरणाची बातमी NDTV मराठीनं दाखवली होती.या बातमीची माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. यानंतर अखेर आज परतूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.