उद्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा होत असून, सत्ताधारी शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून मुंबईतील गोरेगावच्या भव्य नेस्को सेंटरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि राज्यातील नव्या राजकीय घडामोडींनंतर होणारा हा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.नेस्को सेंटरमधील या भव्य तयारीची रूपरेषा कशी आहे, तिथले नियोजन कसे करण्यात आले आहे, याचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी.