मुंबईत उद्या दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणारेय. या निमित्ताने राजकीय वातावरण कमालीचे तापलंय.यंदा ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडणारेय.मात्र या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आक्रमक बॅनरबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.या सोहळ्यासाठी मुंबईत अत्यंत लक्षवेधी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर प्रबोधनकार ठाकरे यांचे 'जानव्याने वळ उठत नाही, त्यासाठी एकजुटीचा सुंभच हवा प्रखर विधान छापण्यात आले आहे. या बॅनरच्या माध्यमातून विरोधकांना थेट इशारा देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे. दुसरीकडे, पक्षात झालेल्या फुटीवरून शिवसैनिकांमध्ये अजूनही प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. बंडखोर आणि फुटीर खासदारांवर प्रतिक्रिया देताना शिवसैनिकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या गद्दार खासदारांना आम्ही तुडवणारच'असा संतप्त इशारा शिवसैनिकांनी दिलाय