ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालंय.. बीड, परभणी, संगमनेर, नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले.. खासदारांविरोधात तीव्र निदर्शन केली जातं आहेत. खासदारांनी मशालीच्या चिन्हावर आणि ठाकरेंच्या चेहऱ्यावर मतं मिळवलं. पण तीच मत आता शिंदे गटाच्या पदरात आयती गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. कुठे खासदारांचे पुतळे जाळले आत आहेत.. तर कुठे पुतळ्यांना जोडे मारून विरोध दर्शवला जातोय.. मुंबईतदेखील बंडखोर खासदारांविरोधात संतापाची लाट उसळलीय.. मुंबईत ठाकरेंच्या तीन खासदारांपैकी अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे ठाकरेंसोबत भक्कमपणे उभे आहेत. मात्र ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केली. याविरोधात मतदारसंघातील भांडूप ,घाटकोप आणि मानखुर्द या भागातील शिवसैनिक प्रचंड आक्रमक आहेत. तर मातोश्री बाहेरही शिवसैनिकांची गर्दी होतेय.. ठाकरेंनी बंडखोर खासदारांविरोधात कठोर पावलं उचलावीत अशी शिवसैनिकांची मागणी आहे..