TCS नंतर Infosys कडून छळवणुकीच्या Social Media वर आरोप; आरोपांवर इन्फोसिसचं स्पष्टीकरण | NDTV मराठी

नाशिकच्या टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणानंतर आता पुण्याच्या इन्फोसिसमध्येही छळवणुकीच्या तक्रारी समोर आल्यात. पण या तक्रारी लैंगिक किंवा धर्मांतराच्या नसून ऑफिसमध्ये छळवणुकीच्या आहेत. सोशल मीडियावर तशा काही तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर इन्फोसिसला स्पष्टीकरण द्यावं लागलंय. आमच्या युनिटमध्ये छळवणुकीच्या कुठल्याही प्रकाराला जागा नसून प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याबाबत आवाज उठवण्याबाबत प्रोत्साहित केलं जातं, तशी यंत्रणा अस्थित्वात असल्याचं इन्फोसिसनं म्हटलंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची सरकारनं दखल घेतल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. पण टीसीएस, इन्फ़ोसिस सारख्या बड्या कंपन्यांमध्ये जिहाद, छळवणूक अशा तक्रारी आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय

संबंधित व्हिडीओ