आम्ही बाळासाहेब विकत घेतले नाही, Kishori Pednekar यांच्या वक्तव्यामुळे BMC मध्ये गोंधळ | NDTV मराठी

शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या एका वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापलंय.. किशोरी पेडणेकर सभागृहात येऊन सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.. सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांकडून बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.. तर सत्ताधारी पक्षाकडून किशोरीताई माफी मागोच्या घोषणा देण्यात आल्या... सभागृह नेते यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी ' बाळासाहेबांचे संस्कार आहेत.. आम्ही बाळासाहेब विकत घेतले नाही' असं म्हटलं आणि त्या सभागृहातून निघून गेल्या.. त्यामुळं महापौरांनी जोपर्यंत किशोरी पेडणेकर सभागृहात येऊन सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करत असल्याचं म्हटलंय.. त्यातच सत्ताधाऱ्यांनी गोंधळही केला.

संबंधित व्हिडीओ