10 नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणी धक्कादायक अहवाल समोर आलाय. या स्फोटात अल कायदाचा हात असल्याचा अहवाल यूएनने दिलाय. या भीषण दहशतवादी हल्ल्यात अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे AQIS चा हात होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या देखरेख पथकाने हा अहवाल तयार केला आहे. यापूर्वी फेब्रुवारीमधल्या अहवालात या हल्ल्याचा संबंध 'जैश-ए-मोहम्मद'शी जोडला गेला होता. AQIS ही संघटना आता मोठ्या संघटनांऐवजी लहान-लहान गटांच्या माध्यमातून दहशतवादी कारवाई करण्याचा कट रचतेय. त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण होत असल्याचंही अहवालात म्हटलंय. बांगलादेशातही ही संघटना नवीन तळ स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचंही अहवालात म्हटलंय.