राज्यात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय...राज्यात आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ४५० विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचा आरोप होतोय.. डॉ. सुभाष साळुंखे समितीच्या शिफारशी दहा वर्षे कागदावरच धूळखात पडल्याचा आरोप होतोय... आदिवासी मंत्री आणि अधिकाऱ्यांना शिक्षणापेक्षा कंत्राटदारांतच रस आहे, प्रशासनाचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा याचिकाकर्ते रवींद्र तळपे यांचा आरोप आहे... गंभीर आजार, सर्पदंश, गळफास आणि अपघात ही चार प्रमुख मृत्यू मागील कारणं असल्याचा दावा करण्यात येतोय..