राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचा मोठा फटका आता नामांकित फूड चेननाही बसला आहे. डॉमिनोज पिझ्झाच्या मुंबईसह राज्यातील चार शाखांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. राज्यभरात १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून अनेकांना सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.दरम्यान विलेपार्ले येथील डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेट बाहेरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी....