रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील घाटिवळे ब्राम्हण वाडी जिल्हा परिषद शाळेचा काही भाग रात्री पावसामुळे कोसळला. पहिली ते सातवी पर्यंतची ही शाळा आहे. कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी वर्ग भरवले जात नव्हते. रात्रीच्या सुमारास शाळेचा भाग कोसळल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही..लोणावळा आणि परिसरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले आहे. ताज्या नोंदीनुसार आज एकाच दिवसात तब्बल ६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.