Pune|Reel Star चे हाँगकाँग कनेक्शन; सायबर फ्रॉड करणाऱ्या रील स्टारला अटक, 10 कोटींची मनी ट्रेल

सीबीआय अधिकारी‌ असल्याची बतावणी करून ‌डिजिटल अरेस्ट‌च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाकडून १० कोटी ७४ लाख रुपये उकळ्याचा प्रकार पुण्यात काही महिन्यापूर्वी घडला होता. या प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिसांनी आधी तीन जणांना अटक केली होती मात्र आता या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला रिल्स्टार रोहन जाधव याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. तपासातून यातील म्होरक्या जाधव चे हाँगकाँग कनेक्शन समोर आलं आहे. आरोपी जाधव ने ज्येष्ठ नागरिकाचे १० कोटी रुपये तब्बल ५००० बँक खात्यांमध्ये वळवल्याची धक्कादायक माहिती तपासातून निष्पन्न झाली आहे.

संबंधित व्हिडीओ