तुम्ही शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी गेलायत का?... मग त्यावेळी तुमचा अनुभव कसा होता? तुम्हालाही तिथल्या भिकाऱ्यांचा त्रास झाला का?..पुन्हा शिर्डीत जाल तेव्हा तुमचा अनुभव काहीसा वेगळा असेल... कारण आता ‘भिक्षेकरी मुक्त साईनगरी’ अशी मोहीम शिर्डीत राबवण्यात येतेय.. आतापर्यंत 70 जणांना ताब्यातही घेण्यात आलंय.. शिर्डीतील चावडी परिसर, द्वारकामाई, सोळा गुंठे, साई कॉम्प्लेक्स, दोनशे रूम, बसस्थानक परिसर यासह विविध ठिकाणी संयुक्त पथकाने कारवाई केली. यामध्ये 56 पुरुष आणि 14 महिला, अशा एकूण 70 जणांचा समावेश आहे.