नवी मुंबईतील उरण फाटा येथे मराठी कामगार सेनेच्या वतीने ओव्हरलोड वाहनांविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आरटीओ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत, ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न होण्यामागे हप्ते घेतले जात असल्याचा दावा केला. रस्त्यांवर सर्रास धावणाऱ्या ओव्हरलोड वाहनांमुळे अनेक अपघात होऊन निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनादरम्यान अनेक ओव्हरलोड वाहने थांबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच, संबंधित वाहनांकडे आवश्यक परवानग्या नसल्याचा दावा करत, तातडीने कारवाई न झाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मराठी कामगार सेनेने दिला.
Uran news Allegations of inaction against overloaded vehicles; Marathi Kamgar Sena stages protest at Uran Phata.