अमरावती जिल्ह्यात चाऱ्याच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झालाय. इतर राज्यांतून येणाऱ्या मेंढपाळांकडून मोठ्या प्रमाणात शेतातील चारा नष्ट केला जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असतानाही मेंढपाळांकडून चाऱ्याची नासधूस सुरूच असल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकार तातडीने थांबवून प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केलीय. अन्यथा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आपण स्वतः लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरू असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतल्याने आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय..