चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाच्या बदलत्या लहरींमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी दाट धुके, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची भीती... अशा एकामागून एक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.न धान कापणी आणि मळणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यातच सकाळच्या सुमारास पडणाऱ्या दाट धुक्यामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. दुसरीकडे शेतशिवारात वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी...