Nagpurच्या Medical College मध्ये रॅगिंग सुरू असल्याचा आरोप, मुलींचे कपडे घालून उष्ट अन्न खायला लावली

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावाखाली ज्युनिअर विद्यार्थ्यांसोबत अमानुष प्रकार केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय., सिनिअर विद्यार्थ्यांनी बीडीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या तीन ज्युनिअर विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. त्यांना कपडे काढण्यास, मान खाली घालून उभे राहण्यास आणि 'मुर्गा' बनण्यास भाग पाडण्यात आले. इतकचं नाही तर मुलींचे कपडे घालायला लावून मेसमध्ये सिनिअर विद्यार्थ्यांचे उरलेले उष्टे अन्न खाण्यास भाग पाडले गेले.या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ