Pune| भोर समिती कार्यालयात जादूटोणा, समितीच्या अधिकाऱ्याच्या टेबलवरच अघोरी प्रकार

पुण्याच्या भोर पंचायत समिती कार्यालयात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पंचायत समिती कार्यालयातल्या अधिकाऱ्याच्या टेबलवर अघोरी प्रकार घडलाय.. टेबलवर एक चिठ्ठी ठेवून लिंबू, हळद, कुंकू ठेवल्याचं समोर आलंय. टेबलावरच्या चिठ्ठीमध्ये सुखाने जगू न देण्याची धमकी संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ