अमरावतीच्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या प्रसिद्ध 'विदर्भाचा राजा' गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस इरविन चौकातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या भव्य मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईटला फाटा देत केवळ ढोल-ताशा पथकांचा गजर पाहायला मिळत आहे. विदर्भाच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारो गणेशभक्त रस्त्यावर उतरले असून 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने राजकमल चौक परिसर दुमदुमून गेला आहे.