उल्हासनगर महापालिकेच्या विशेष महासभेत गोंधळ. भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश. महापालिकेत महापौर अश्विनी निकम यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना यापूर्वी तीन महासभांसाठी निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, आज स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेला प्रधान पाटील उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.प्रधान पाटील सभागृहात उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी सुरक्षा रक्षकांना प्रधान पाटील यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. यावेळी काही काळ सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
Uproar at the Ulhasnagar Municipal Corporation's special general body meeting; orders issued to remove Corporator Pradhan Patil from the hall.