रायगडच्या दिवेआगर येथे फिरण्यासाठी आलेल्या आठ जणांचा पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.