पुण्यातील मुळशी तालुक्यात दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघानं केलीय. मुळशीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय.पावसाअभावी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याची पिके धोक्यात आली असून, वाळून गेलीत.. त्यामुळे कोणतेच पीक हाती लागणार नाही तसेच शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे..त्यामुळे इतर तालुक्यांप्रमाणे मुळशी तालुक्यातही दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघाने केलीय..दुष्काळ जाहीर न केल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघानं दिलाय.