जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यावर यंदा दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे... तालुक्यात तब्बल 85 हजार हेक्टर क्षेत्र दुष्काळाच्या संकटात सापडलेय.., सुमारे 80 हजार शेतकऱ्यांना या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे... पावसाने तब्बल दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतातील पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे... कापूस, मका आणि भुईमूग या प्रमुख पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे... अपेक्षित पाऊस न मिळाल्याने काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली, तर काही भागात उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे... पिकांवर केलेला खर्चही निघण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गंभीर झाले आहे.