रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या 8 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथील विनर्स अॅकेडमी या खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती.यामध्ये 6 शिक्षक आणि 42 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
Raigad | Names of the 8 'Winners Academy' students who drowned in the Diveagar sea revealed.