मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंबईत सीजेपीचा मोर्चा होणारेय. सीजेपीला दादर शिवाजी पार्क येथे आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आलीय. मात्र सीजेपी आंदोलनावर ठाम आहे. गुन्हे दाखल केले तरीही मागे हटणार नाही असं म्हणत दीपकेंनी जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलाय. यावेळी अभिजीत दीपकेंनी फडणवीसांनाही अमित शाहांनी केलेली चूक तुम्ही करू नका असा सल्ला दिला..