कल्याणमधील नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात एका परप्रांतीय तरुणाने मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मनसेने या प्रकरणात उडी घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.