#sandipanbhumre #incometaxnotice #sambhajinagar #ndtvmarathi महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आता आणखी एका वादग्रस्त प्रकरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अडचण वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर तब्बल ५०० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे.