माढा तालुक्यातील मोडनिंब जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असल्याने तीन वर्षापासून शाळा मोकळ्या मैदानावर भरते. शाळेच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर वर्ग खोल्याच उपलब्ध नसल्याने शिक्षक मुलांना घेऊन झाडाखाली मोकळ्या मैदानावर शाळा भरवत आहेत. 19 खोल्यांपैकी दहा खोल्या या धोकादायक स्थितीत आहेत. असा रिपोर्टही सहा ऑगस्ट 2023 ला शाळेला देण्यात आलाय. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोकळ्या मैदानावर शाळा भरली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शाळेच्या उताऱ्यावरही फेरफार झाल्याने शाळेचे क्षेत्रही कमी झाले असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.