वाशिम तालुक्यातल्या काटा इथल्या शाळेच्या दूरवस्थेची बातमी NDTV मराठीने दाखवली आणि अवध्या दोन तासात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं शाळेत धाव घेतली. काटा इथल्या जिल्हा परिषद शाळेत नव्या वर्गखोल्या बांधून तयार होत्या. पण जून्या आणि जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना बसवलं जात होतं. NDTV मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर आता शिक्षण विभागाची टीम शाळेत पोहोचलीय. त्यांनी पाहणी केली आणि धोकादायक वर्गखोल्यांच्या पाडकामालाही सुरुवात करण्यात आलीय.