अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीनं लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आहे. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाचं स्वागत केलंय. आणि आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. या गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा energy drinks विक्री केली जात नाहीत.