महादेव मुंडे यांच्या पत्नी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांची भेट घेण्यासाठी परळीहून रवाना झाल्या. या प्रकरणातील आरोपी अटक केले जावेत शिवाय याचा तपास सिट किंवा सीआयडी कडे देऊन न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अन्यथा उपोषणावर ठाम असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटल आहे. पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर उपोषणाबाबत ज्ञानेश्वरी मुंडे या निर्णय घेणार आहेत. एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला परळीतील महादेव मुंडे यांचा तहसील कार्यालय परिसरात खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अद्यापही या आरोपींना अटक झालेली नाहीये.