नाशिकच्या डीपीडीसी बैठकी संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात बैठक झाली. मात्र या बैठकीला शिवसेना आमदारांनी आणि मंत्री भरत गोगावले यांनी पाठ फिरवली. शिवसेना आमदारांना बैठकीला बोलावलंच नसल्यानं शिवसेना आमदारांमध्ये नाराजी होती अशी माहिती मिळते आहे. दरम्यान जिल्हा नियोजन बैठकीत फक्त मंत्र्यांनाच बोलावलं मात्र गोगावले आलेच नाहीत असं स्पष्टीकरण अजित पवार गटानं दिला आहे. आणि त्यामुळे आजच्या बैठकीत फक्त अदिती तटकरे आणि अजित पवार हे दोघेच उपस्थित होते. रायगडच्या डीपीडीसी बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं. शिवसेना आमदारांनी या बैठकीला पाठ फिरवली. दरम्यान मंत्री भरत गोगावलेना बोलावूनही आले नाहीत असं अजित पवारांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान आजची बैठक ही पालकमंत्र्यांची नसू ही बैठक डीपीडीसी ची होती. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सोडवू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेने दिली आहे.