तानाजी सावंत प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी सरकारवर निशाणा साधला तसंच परभणी प्रकरणामध्ये सुरेश ढस यांची दुटप्पी भूमिका दिसून येते आहे असंही म्हटलंय. याबाबत अंजली दमानिया यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण होऊन गेले आहेत मात्र मुख्य आरोपी अजूनही फरार आहे त्याचा एक नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे नेमकं आता तरी पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत अंजली दमाने आहे ताई काय सांगाल मुख्य आरोपी फरार आहे एक नवीन व्हिडिओ त्याचा सापडला आहे वाटतं आता तरी पोलिसांना सोपं जाईल कृष्णा आंधळेला पकडण्यात नाही या व्हिडिओचा आणि कृष्णा आंधळेचा तसा संबंध येणार नाही आहे पण हा जो व्हिडिओ बाहेर आला आहे आणि अतिशय गंभीर आहे याच्यात आपल्याला सांगण्यात येतंय की मागून पोलिसांची गाडी यांचा पाठलाग करत होती. पुढे पोलीस अटक करण्यासाठी उभे होते. मग ही गाडी मध्ये थांबते आणि हे उतरून पळून जातात. याचा अर्थ ह्यांना कळलं होतं की पुढे देखील पोलीस आहेत. म्हणजे याला सरळ सरळ टिप ऑफ म्हंटलं जातं.