बीडच्या परळी जवळील शिरसाळा इथे दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एक बुलेट पेटवण्यात आली आहे. या प्रकरणात परस्पर विरोधी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. परळी तालुक्यातील शिरसाळा इथे आठवडी बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेतील एका गटानं बुलेट पेटवली.